पिरावाडी – दक्षिणवाडा येथे ‘योग मार्गदर्शिका’ पुस्तकाचे प्रकाशन व हस्तातरण सोहळा संपन्न

श्रीकृष्ण मंदिर, पिरावाडी दक्षिणवाडा येथे श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लेखक भीमसेन हरी सारंग लिखित ‘योग मार्गदर्शिका’ या पुस्तकाचा प्रकाशन व हस्तातरण सोहळा मोठ्या उत्साहात वार्षिक सभेत संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी श्री तरुण संघ, दक्षिणवाडा चे अध्यक्ष दिनानाथ धुरी, श्री हनुमान मंदिर न्यास, पिरावाडी दक्षिणवाडा चे अध्यक्ष गिरीधर सारंग हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी दत्त कुमार धुरी, मुरलीधर कोळबकर, प्रसाद केळुसकर, गोविंद कोयंडे अर्जुन रोगे भगवान धुरी हनुमंत तोडणकर महेंद्र जोशी, सुरेंद्र कुबल विजय जोशी रत्नाकर सारंग भगवान कोळबकर आदी सह मुंबईस्थित मंडळाचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ,श्री तरुण संघ, दक्षिणवाडा चे अध्यक्ष दिनानाथ धुरी यांनी
सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असून ‘योग मार्गदर्शिका’ हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून
हनुमान मदिर पिरावाडी येथे लवकरच योगासन वर्ग चालू करण्यात येणार आहेत लेखक भीमसेन हरी सारंग यांनी योग साधनेचा सखोल अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे.

या सोहळ्याला मंडळाचे मुंबई व गावातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री तरुण संघ दक्षिणवाडा व श्री हनुमान मंदिर न्यास पिरावाडी दक्षिण वाडा यांस कडून आतापर्यंत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भविष्यात रक्तदान शिबिर व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम आदींसह विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचा मंडळाचा मानस असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री गिरीधर सारंग यांनी यावेळी सांगितले या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन श्री रामचंद्र कुबल यांनी केले

error: Content is protected !!