कणकवली आगाराचे वाहक श्री.प्रवीण नेवरेकर आणि चालक श्री.सतीशचंद्र रावराणे यांचा प्रामाणिकपणा

सध्य स्थितीत असा प्रामाणिकपणा दुर्मिळच -श्री. वामन तर्फे
संतोष हिवाळेकर पोईप
सोमवार दिनांक १४/९/२६रोजी कुमार हर्षल वामन तर्फे,जांभवडे सध्या शिक्षणासाठी पुणे येथे वास्तव्यास पुण्याहुन गणेश उत्सवासाठी सकाळी कणकवली येथे आला.जांभवडे येथे आपल्या मुळ गावी जाण्यासाठी सकाळी ७.३०ची कणकवली -घोटगे-सोनवडे बसने निघाला.बस जांभवडे येथे आल्यानंतर बसला गर्दी असल्याने महत्वाचा अभ्यासक्रम असलेला लॅपटॉप असलेली स्कुल बॅग बसमध्ये विसरला.सदर बॅगेमध्ये अभ्यासाचे पुस्तक, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड असलेले पाकिट,काही कपडे होते.सदर बॅग एक दिवस बस बरोबर प्रवास करत होती.सदर बॅग दुसऱ्या दिवशी प्रवासा दरम्यान बसचे प्रामाणिक आणि निस्वार्थी वृत्ती असलेल्या कणकवली आगाराचे वाहक श्री.प्रवीण नेवरेकर (कसुर,वैभववाडी)यांच्या निदर्शनास आली.किंमती वस्तू आपल्याकडे ठेवण्याचा कोणताही मोह नसलेल्या कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान देत सदर बॅगेत लॅपटॉप आणि इतर महत्त्वाच्या वस्तू आहेत हे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ सदर बॅग रितसर सर्व साहित्याची नोंद करून कणकवली येथील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली.किंमती लॅपटॉप आणि इतर महत्त्वाच्या वस्तू असलेली बॅग अशा प्रकारे मालकाला मिळावी या हेतूने संबंधित यंत्रणेकडे देणे हे प्रामाणिकपणाचे उत्कृष्ठ उदाहरण आहे.असा प्रामाणिकपणा सध्याच्या काळात दुर्मिळच आहे.या घटनेने समाजातील विश्वास आणि माणुसकिवरील श्रद्धा अधिक दृढ झाली आहे.सामान्य कर्मचारी असलेल्या वाहक श्री.नेवरेकरांसारखी आणि श्री.रावराणे यांच्यासारखी माणसं या जगात आहेत हे भाग्यच आहे.माणुसकी हीच खरी संपत्ती आहे .हे या दोघांनी दाखवून दिले आहे.दिनांक १५/९/२६रोजी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक खात्री करून कु.हर्षल तर्फे याच्या ताब्यात दिली.एसटी कार्यालयात आपल्या सर्व साहित्यासह असेलेली बॅग बघून श्री.गणेशाचे भक्त असलेल्या कु.हर्षल यांच्या चेहऱ्यावर असलेल्या भावना बघून एसटी अधिकारी समाधानी झाले.कु.हर्षलचे वडील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांनी बस वाहक श्री.प्रवीण नेवरेकर आणि त्यांचे सहकारी चालक यांच्या प्रामाणिकपणा बद्दल मनापासून आभार मानले आणि श्री.नेवरेकर यांचा प्रामाणिकपणा आणि श्री.गणेशावर असलेली कु.हर्षल आणि आपली नितांत श्रद्धा यामुळे सदर बॅग मिळाल्याची भावना व्यक्त केली.श्री.नेवरेकर यांनी आपल्या कुटुंबियांचे आणि नातेवाईकांचे असलेले संस्कार आहेत आणि त्यामुळे या सारखे कार्य आपल्याकडून घडते असे सांगितले व प्रवाशांची सेवा आणि त्यांची व त्यांच्या सामानाची सुरक्षितता हे आपले कर्तव्य व जबाबदारी असल्याचे सांगितले






