कुडाळ मध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत ९० प्रकरणे तडजोडीने निकाली

५ लाख ९२ हजार ८१८ रुपयांची वसुली

कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ९० प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांतून एकूण ५ लाख ९२ हजार ८१८ रुपयांची वसुली करण्यात आली.
कुडाळ तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा कुडाळच्या सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक सरकारी वकील श्रीमती अमृता मिरजे व श्रीमती स्वाती पाटील, पंचायत समिती प्रतिनिधी श्री. सी. डी. परब, तसेच वकील आर. डी. बिले, वकील गौरव पडते आणि पवित्रा धुरी यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी एक पॅनेल स्थापन करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता अमेय बकरे, तर पॅनेल सदस्य म्हणून अधिवक्ता पवित्रा धुरी यांनी काम पाहिले.
बाबलोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरूपाची १०९ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच वादपूर्व स्वरूपाची १,१८५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे एकूण १,२९४ प्रकरणांपैकी ९० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यातून ५ लाख ९२ हजार ८१८ रुपयांची वसुली झाली.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक यांच्या शाखाधिकाऱ्यांसह वीज वितरण कंपनी व भारत दूरसंचार निगम लिमिटेडचे लेखापाल उपस्थित होते.
लोकअदालतीचे कामकाज यशस्वीपणे पार पाडण्यासाठी न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षक श्रीमती प्रणाली सावंत, तसेच न्यायालयीन कर्मचारी व्ही. बी. गुरव, लघुलेखक आर. टी. आरेकर, वरिष्ठ लिपिक ए. ए. परब, आर. आर. राणे, एस. एस. बालम, एच. ए. कारेकर, डी. आर. घाडीगांवकर आणि शिपाई श्री. चव्हाण व श्री. परब यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!