जाळ्यात अडकलेल्या घुबडाच्या पिल्लाला जिवदान

देवूळवाडी येथील पक्षीप्रेमी दशरथ घाडी यांची तत्परता

आचरा देवूळवाडी येथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक म्हणून लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या घुबडाला पक्षीमित्र दशरथ घाडी यांनी तत्परता दाखवत जाळ्यातून सुटका करत नैसर्गिक अधिवासात सोडले.
आचरा देवूळवाडी येथे सोमवारी सकाळी गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच गांगेश्वर मंदिरालगत सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात घुबड अडकल्याचे पक्षीमित्र दशरथ घाडी यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत येथील युवक दुर्वांग नलावडे,प्राथमिक शिक्षक संदीप नलावडे यांच्या सहकार्याने त्याची जाळ्यातून सुटका करत नैसर्गिक अधिवासात सोडले. घुबड हा निशाचर पक्षी म्हणून ओळखला जातो. शेतीत पिकांचे नुकसान करणारे उंदीर घुबड खातो .त्यामुळे घुबडाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. परीसंस्थेतील अशा महत्वाचा घटक असलेल्या घुबडाला जिवदान दिल्यामुळे पक्षी मित्र दशरथ घाडी यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!