तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये पाट हायस्कूलचे वर्चस्व कायम

कुस्ती, कबड्डी, व्हॉलीबॉलमध्ये पाट हायस्कूलची विजयी घोडदौड

तालुकास्तरीय शालेय कबड्डी, व्हॉलीबॉल व कुस्ती क्रीडा स्पर्धांमध्ये पाट हायस्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विद्यालयाचे वर्चस्व कायम राखले. विविध वयोगटांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवत विजेतेपदांसह उपविजेतेपद पटकावले.

कुस्ती स्पर्धेत १० खेळाडू प्रथम; एकाला द्वितीय क्रमांक

  दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या कुस्ती स्पर्धेत पाट हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. १४ वर्षे वयोगटात कुमार तुकाराम धनगर (३८ किलो) आणि कुमार पियुष पाटकर (४४ किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
 १७ वर्षे वयोगटात कुमारी प्रणाली ठुंबरे (५३ किलो), कुमारी दीक्षा निवतकर (६५ किलो), कुमार अक्षय राऊळ (४५ किलो) आणि कुमार वेदांत चव्हाण (६५ किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर कुमार विनय कुडाळकर (४५ किलो) याने द्वितीय क्रमांक पटकावला.
 १९ वर्षे वयोगटात कुमार बापू राऊळ (५७ किलो), कुमार वेद कामतेकर (७४ किलो), कुमार मंदार घाडी (७९ किलो) आणि कुमारी मनस्वी केरकर (६३ किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

व्हॉलीबॉलमध्ये सहापैकी पाच गटांत यश

दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलने सहापैकी पाच गटांत विजेतेपद, तर एका गटात उपविजेतेपद मिळवले. १४ वर्षे मुले व मुली तसेच १९ वर्षे मुले व मुलींच्या संघांनी विजेतेपद पटकावले. १७ वर्षे मुलींच्या संघानेही विजेतेपद मिळवले, तर १७ वर्षे मुलांच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

कबड्डीत दोन विजेतेपदांसह दोन उपविजेतेपद

 दि. ८ व ९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या कबड्डी स्पर्धेतही पाट हायस्कूलच्या संघांनी दमदार कामगिरी केली. दोन गटांत विजेतेपद, तर दोन गटांत उपविजेतेपद मिळवले. १७ वर्षे मुली व १९ वर्षे मुले या गटांनी विजेतेपद पटकावले, तर १९ वर्षे मुली आणि १४ वर्षे मुलींच्या संघांनी उपविजेतेपद मिळवले.
 या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय पवार, डी. ए. कुबल तसेच माजी क्रीडा शिक्षक हंजनकर सर, दाजी रेडकर आणि माजी खेळाडू रुपेश कोनकर, सिद्धार्थ गावडे, चेतन पाटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक बोंदर सर, पर्यवेक्षिका सौ. मोडक मॅडम, संस्थेचे चेअरमन देवदत्त साळगावकर सर, कार्यवाह विजय ठाकूर सर तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व विजयी संघ, खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!