शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या घुमडे येथील निवासस्थानी आज श्री सत्यनारायण महापूजा

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांच्या घुमडे, ता. मालवण येथील निवासस्थानी बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होणार असून, महापूजेनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महापूजेचा धार्मिक विधी बुधवारी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यावेळी सत्यनारायण भगवानाची विधिवत पूजा, आरती तसेच धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या पवित्र धार्मिक सोहळ्यास हितचिंतक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी भाविकांसाठी भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. महापूजा व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याला सर्व हितचिंतक तसेच ग्रामस्थ आणी नागरिकांनी उपस्थित राहून श्री सत्यनारायण भगवानाचा आशीर्वाद घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!