कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन

27 एप्रिल रोजी हॉटेल नीलम कंट्रीसाईडच्या मागील मैदानात होणार स्पर्धा
शर्यत प्रेमींनी लाभ घेण्याचे तालुकाप्रमुख यांचे आवाहन
कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने विना फटका राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन जानवली वायगवडेवाडी हॉटेल नीलम कन्ट्रीसाईड च्या मागील बाजूस 27 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारच्या सर्व अटी शर्तींचे पालन करून ही स्पर्धा घेतली जाणार आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर या प्रमुख उपस्थित असणार आहेत. तर या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उदयोग मंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक व रत्नसिंधू समितीचे सदस्य किरण सामंत उपस्थित राहणार आहेत. या बैलगाडा शर्यत स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख श्री परुळेकर यांनी केले आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली