कुडाळ तालुक्यात चिमुकलीचा तापसरीने मृत्यू ?
कुडाळ : तालुक्यातील अणाव बामणवाडी येथील यान्वी शंकर परब (४ वर्ष) या चिमुकलीचा राहत्या घरी मृत्यू झाला आहे. तिला ताप येत असल्याने शरीरातील पाणी कमी झाले. तसेच रक्तदाब कमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. यान्वी हिला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे तिला कुडाळ येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिला शुक्रवारी घरी आणले होते. मात्र, शनिवारी पहाटे तिची प्रकृती अचानक खालावली. दरम्यानच्यावेळी तिला उलटी, संडासचाही त्रास झाला आणि तिचे घरीच निधन झाले. तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
कुडाळ, प्रतिनिधी