रविवारी कणकवली त” कृतज्ञ मी! कृतार्थ मी!!”चे प्रकाशन

कणकवली : नाटळ विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक अरुण महादेव वळंजु यांच्या” कृतज्ञ मी !कृतार्थ मी !!” या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता नगर वाचनालय सभागृह कणकवली येथे होत आहे.
तळेरे येथील व्यासंगी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषदचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, पंडित प्रेसचे उदय पंडित आणि कोकण नाऊ चे वरिष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होत आहे.
कृतज्ञ मी या पुस्तकात अरुण वळंजु यांनी आपल्या आयुष्यात भेटलेल्या व्यक्ती आणि त्यांच्याविषयीचा कृतज्ञता भाव या पुस्तकाद्वारे व्यक्त केला आहे. सुधाकर महादेव वळंजु आणि वळंजु परिवार यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास वाचन प्रेमींनी तसेच कणकवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वळंजु परिवारातर्फे करण्यात आले आहे.