बांद्यातील गुटखा वाहतुकीचे धागेदोरे थेट कणकवली पर्यंत?

गुटखा विक्री व्यवसायातील “राज” करणाऱ्या सह “अंडी, पील्ली” बाहेर येणार का साऱ्यांचे लक्ष
या गुन्ह्यातील पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
नुकतीच बांदा येथे गुटखा वाहतूक प्रकरणी कारवाई करण्यात आल्यानंतर या प्रकरणात अनेक नावे समोर आल्याची चर्चा आहे. त्यात करून या व्यवसायात कणकवली मध्ये “राज” करणाऱ्याची नावे समोर आली आहेत. त्यातच या व्यवसायाची “अंडी, पिल्ली” मुळासकट उखडून टाकण्याचा काढण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी काही दिवसानंतर दिल्यानंतर सुधा पोलीस प्रशासनाचे दोन दिवसापूर्वी कणकवलीत मध्यरात्री तपासणीच्या वेळी झालेले धारिष्ट वाखाण्याजोगे आहे. बांदा येथे वाहतूकदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या डायरी व गुगल पे मध्ये काही आर्थिक व्यवहार सापडल्याची चर्चा कणकवली शहरात आहे. व यातूनच बांद्या मधील गुटखा वाहतुकीचे धागेदोरे थेट कणकवलीत पोहोचले. त्यानंतर एका अधिकारी स्तरावर “गवस”लेल्या एकाने या सर्व प्रकरणात चौकशी केल्याचे भासवले. परंतु त्यापूर्वी काय घडामोडी झाल्या? त्याची देखील चर्चा आता कणकवलीत रंगू लागली आहे. दरम्यान या चौकशीच्या ससेमिऱ्यात हाती काही लागले नसल्याने हे पथक माघारी गेले. व त्यानंतर गुटखा विक्री मध्ये सहभागी असलेल्या कणकवलीतील ते “दोघे” आणि उर्वरित काही जणांच्या नावांची चर्चा जोर धरू लागली आहे. परंतु पोलिसांकडून याबाबत चार दिवस उलटल्यानंतरही प्रकरणात तथ्य नसल्याचे भासवले जात असल्याची देखील चर्चा आहे. व यातूनच पालकमंत्र्यांनी यापूर्वी दिलेला इशारा पोलीस विसरले का? असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या बाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात? त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली






