कणकवली बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी ॲड. राजेश परुळेकर यांची निवड

गेली अनेक वर्ष ॲड. परुळेकर वकिली व्यवसायात कार्यरत
कणकवली बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेश परुळेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे वकील संघटनेत तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ॲड. राजेश परुळेकर यांनी अनेक वर्षे वकिली व्यवसायात काम करताना न्यायव्यवस्थेप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. बारमधील सर्व वकिलांना विश्वासात घेऊन संघटनेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा त्यांचा निर्धार आहे. वकिलांच्या व्यावसायिक अडचणी सोडविणे, न्यायालयीन सुविधांमध्ये सुधारणा करणे, नवोदित वकिलांना मार्गदर्शन करणे तसेच बारमधील एकोप्याला अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल कणकवली तालुक्यातील वकील, विविध सामाजिक संस्था, मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यकाळात कणकवली बार कौन्सिल अधिक सक्षम आणि प्रगतिशील वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी कणकवली मधील वकिलांनी त्यांचा सत्कार केला.
कणकवली प्रतिनिधी






