आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुका वकील ग्रंथालयाला 50 हजारांची पुस्तके अदा

ऍड. राजेश परुळेकर यांनी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बर्वे यांच्याकडे केली पुस्तके प्रदान

कणकवली कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या विकासनिधीतुन कणकवली तालुका बार असोसिएशन, कणकवली यांना ग्रंथालयासाठी उपलब्ध झालेली रक्कम रुपये 50 हजार ची पुस्तके अँड. राजेश परुळेकर यांचेकडुन कणकवली तालुका बार असोसिएशन अध्यक्ष अँड. अनिल बर्वे यांचेकडे सुपुर्त करण्यात आली. याप्रसंगी ऍड.संदीप राणे, मिलिंद सावंत, अँड. रेखा सावंत, ऍड.भुषण बिसूरे, ऍड.गणेश पारकर, पुस्तक विक्रेते किशोर सतदिवे आधी उपस्थित होते वकील संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. याकरिता ऍड. परुळेकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!