सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवडअध्यक्षपदी गजानन संभाजी सावंत, उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ म. सिंधुदुर्ग या संस्थेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. आज दि. 30/07/2026 रोजी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. आर. टी. चौगुले यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी :

  1. अध्यक्ष : श्री. गजानन संभाजी सावंत
  2. उपाध्यक्ष : श्री. विनोद रामचंद्र मर्गज

सत्कार व मनोगत : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कार्यक्रम पार पडला. श्री. दळवी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सावंत व उपाध्यक्ष श्री. मर्गज यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी “आपण व आपले सर्व सहकारी यांचे मार्फत मंडळास आवश्यक ते योग्य सहकार्य करू” असे मत श्री. दळवी यांनी व्यक्त केले.

नवनिर्वाचित अध्यक्षांची भूमिका : जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या पोषक वाढीसाठी व सहकारी संस्था सक्षम बनविण्यासाठी सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना कार्यक्षम बनविण्यासाठी बदलत्या काळानुसारचे सहकारी शिक्षण-प्रशिक्षण सहकारी मंडळामार्फत देणेत येईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गजानन सावंत व उपाध्यक्ष श्री. विनोद मर्गज यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

नवनिर्वाचित संचालक मंडळ : श्री. विलासराव बा. ऐनापुरे, श्री. गजानन सु. गावडे, श्री. मधुसुदन के. गावडे, श्री. सुभाष रा. तळवडेकर, श्री. केशव र. नारकर, श्री. प्रकाश मु. सावंत, श्री. सुरेश ज्ञा. चौकेकर.
संचालिका : श्रीम. कुंदा प्र. पै, श्रीम. प्रज्ञा प्र. परब
यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री. मंगेश रा. पांचाळ उपस्थित होते.

error: Content is protected !!