कातकरी समाजाच्या लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालय कणकवली मार्फत जात प्रमाणपत्रासाठी अभियानाचे आयोजन

कणकवली तहसीलदार कार्यालयामार्फत 27 लाभार्थ्यांचे भरून घेण्यात आले अर्ज
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी समाजाच्या 27 लाभार्थी यांचे जात प्रमाणपत्रासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले. सोबतच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण व महसूल विभागामार्फत संयुक्त पंचनामा करण्यात आला.
कातकरी ही आदिम जमात असल्याने व त्यांच्याकडे कागदपत्रांची उपलब्धता नसल्याने आदिवासी विकास विभाग व महसूल विभाग यांच्यामार्फत संयुक्त पंचनामा केला जातो.
तहसील कार्यालय कणकवली येथे आयोजित केलेल्या कॅम्प मध्ये आदिवासी विकास विभागाचे अधिकारी निलेश नाईक व महसूल विभागामार्फत नायब तहसीलदार मुकुंद मंडले, सहायक महसूल अधिकारी सत्यवान माळवे, मंडळ अधिकारी नीलम नारकर, ग्राम महसूल अधिकारी नयन चौगुले हे उपस्थित होते.
शैलजा कदम, नामानंद मोडक यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन सर्वतोपरी सहाय्य केले.
महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सदरचा उपक्रम राबविण्यात आला.
या सर्व लाभार्थी यांना जात प्रमाणपत्र पुढील आठवड्यात प्रदान करण्याचे नियोजित आहे.






