वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

भाविकांची अलोट गर्दी

आमदार कालिदास कोळंबकर यांनी घेतले स्वामींचे दर्शन

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात भाविकांच्या अलोट गर्दीत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर यांनी उपस्थिती दर्शवीत स्वामींचे दर्शन घेतले. स्वामी समर्थ मंडळातर्फे अध्यक्ष दिपक सुर्वे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष बाबू हडकर,उपाध्यक्ष दिनेश साळकर,चिटणीस कल्याण साळकर,खजिनदार प्रफुल्ल माळकर,रामदास प्रभू,पंडीत खोत,सुधीर घागरे आदी उपस्थित होते. वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरु पूर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पहाटे पाच वाजता स्वामींच्या मुर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर नित्य आरती नंतर गुरु दिक्षा सोहळा संपन्न झाला. दुपारी महाआरती नंतर स्वामी समर्थ मंडळातर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा भाविकांनी लाभ घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त पंचक्रोशीतील स्थानिक भजन मंडळांनी स्वामींच्या चरणी आपली भजन सेवा अर्पण करत स्वामी नामाचा जयघोष केला होता.

error: Content is protected !!