राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमक.

कणकवली:मयूर ठाकूर

राज्यस्तरावर रंगोत्सव सेलिब्रेशनच्या घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून कलरिंग, स्केचिंग,हॅन्ड रायटिंग, टॅटू मेकिंग, फिंगर प्रिंट, अशा विभागात विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते.
यामध्ये प्रशालेच्या कु.सोयटा मोंडल , महंम्मद जैद शेख आणि सार्थक परब यांनी कलरिंग मध्ये यश प्राप्त केले आहे तर देवराज गुरव, विघ्नेश वालावलकर आणि रेहान नावलेकर यांनी हॅन्ड रायटिंग मध्ये आपलं कौशल्य दाखवत या स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. तर नील मेस्त्री याने स्केचिंग या प्रकारात यश मिळवले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम, स्कूलचे कॉर्डिनेटर निलेश घेवारी सर यांच्या हस्ते ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विध्याधर तायशेटे सर,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार डी.पी. तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!