कणकवली शहरातील मसुरकर किनई रस्ता बनला पार्किंग झोन

कणकवली नगरपंचायत व पोलीस प्रशासन लक्ष देणार का?
जनतेतून उपस्थित केला जातोय सवाल
कणकवली शहरातील काही वर्षांपूर्वीच नव्याने अस्तित्वात आलेला मसुरकर किनई रस्ता सध्या पार्किंग झोन बनला आहे. गेले काही महिने या रस्त्यावर सातत्याने दुचाकी, चार चाकी, व ट्रक, डंपर पार्किंग करून ठेवले जात आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालक व नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे कणकवली नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन या दोघांचेही दुर्लक्ष होत आहे. कणकवली शहरातील जनतेला चांगली सुविधा देत असताना शहरातील नागरिकांसाठी नव्याने अस्तित्वात आलेले रस्ते हे अडथळ्यांची शर्यत ठरत असतील तर त्याला जबाबदार कोण? असा देखील सवाल शहरवासीयांमधून केला जात आहे. त्याचा या ठिकाणी असलेल्या एसएम हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना देखील हे पार्किंग धोकादायक ठरत असून याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.






