कलमठ ग्रामपंचायतचा असाही आदर्श

ग्रामपंचायत कलमठने आपले सेवा सरकार मधून दिले ६२७ दाखले

सरपंच संदीप मेस्त्री यांची घरपोच दाखले सेवा कायम

कलमठ ठरली सर्वाधिक शैक्षणिक दाखले देणारी ग्रामपंचायत

कलमठ ग्रामपंचायत मध्ये पालकमंत्री नितेश राणे, तत्कालीन जिल्हाधिकारी अनील पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जून २०२५ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयात आपले सेवा सरकार उपक्रमचा शुभारंभ ग्रामपंचायत कलमठ येथे झाला होता. एका वर्षात कलमठ ग्रामपंचायतने ६२७ शैक्षणिक दाखले दिले. कलमठ गावातील पालक समाधान व्यक्त करत असून ग्रामस्थ कौतुक करत आहेत. उच्च शिक्षणासाठी लागणारे उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला, ईडब्लूएस दाखला,जेष्ठ नागरिक कार्ड सर्वं मिळून ६२७ दाखले पालकांना उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायत मध्ये सादर केल्या नंतर सर्वं दाखल्यांसाठी सरपंच संदीप मेस्त्री स्वतः तहसील कार्यालय पर्यंत पाठपुरावा करत असून प्रांतधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यासाठी विशेष सहकार्य करत आहेत त्यामुळे दाखले सहज आणि जलद उपलब्ध होत आहेत. दरवर्षी प्रमाणे सरपंच संदीप मेस्त्री दाखले घरपोच देण्याचा उपक्रम अखंडितपणे राबवत आहेत. यासाठी केंद्र चालक जयेश मेस्त्री यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!