जानवली केंद्र शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून एलईडी टीव्ही भेट

शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे व्यक्त करण्यात आले आभार

केंद्रशाळा मारुती मंदिर जानवली येथील 1995-96 या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी या शाळेला एलईडी टीव्ही भेट दिला. या शाळेचे पदवीधर शिक्षक प्रदीप मांजरेकर यांनी याकरिता विद्यार्थ्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी केंद्रमुख्याध्यापक रश्मी रंजन राणे, श्री.मराठे, श्रीमती पलांडे, वेदिका राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अदिती तेली आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यां मार्फत श्री. योगेश नायर यांनी शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. आभार श्री. मराठे यांनी मानले. शाळेचे माजी विद्यार्थी राजेश राणे, अभिनंदन साटम, दशरथ चव्हाण, योगेश नायर, अमित राणे, नाना लुडबे, आनंद राणे, श्रीकांत सावंत, वैभव वाघटे, समीर तावडे, अजय लाड, योगेश पिंगे यांनी ही टीव्ही भेट दिली. त्याबद्दल शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!