त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि पालक मेळावा संपन्न

त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई ( शिरवंडे,असगणी, किर्लोस ) संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावी परिक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यात प्रथम क्रमांक प्राप्त कुमारी स्नेहल सोनू गावकर ,द्वितीय क्रमांक प्राप्त कुमारी विशाका विवेक पारकर ,तृतीय क्रमांक प्राप्त कुमारी श्रुती अजित घाडीगांवकर यांचा सन्मान करण्यात आला.तसेच सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी पालक मेळावा आयोजित करण्यात आला.मेळाव्याला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री वामन तर्फे यांनी प्रास्ताविक करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच पालक मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या गरजा मांडल्या आणि गरजा भागविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.या वेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत चर्चा करण्यात आली.सहाय्यक शिक्षक श्री.काणेकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या.संस्था सहसचिव श्री .विजय घाडीगांवकर यांनी पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले आणि संस्थेच्या कामाचा आढावा घेतला.तसेच शाळेच्या गरजा भागविण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.पालकांनी शैक्षणिक चर्चेत सहभाग घेतला आणि आपली मते मांडली.सहाय्यक शिक्षक श्री.सुभाष सावंत यांनी मागील मेळाव्याचे इतिवृत्त वाचन केले.यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री दशरथ घाडीगांवकर, शालेय समिती सदस्य श्री.सुहास चव्हाण, श्री कैलास घाडीगांवकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ.मानसी गांवकर, श्री.अजित घाडीगांवकर, ज्येष्ठ नागरिक श्री.रामचंद्र गांवकर उपस्थित होते.शेवटी सहाय्यक शिक्षक श्री.राजेश धाडगा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!