कणकवली तालुक्यात गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा सुळसुळाट

कणकवली पोलिसांची मात्र या दारू विक्री कडे डोळेझाक
वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देणार का?
कणकवली तालुक्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचा सुळसुळाट सुरू असताना मात्र याकडे पोलिसांची डोळेझाक होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी सलग कारवाईचा धडाका लावला. मात्र गावागावांमधून हातभट्टी व गोवा बनावटीची दारू विकणाऱ्या विक्रेत्यांकडे पोलीस दुर्लक्ष करण्यामागे नेमकी कारणे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कणकवली पोलिसांकडून याबाबत कारवाईकडे डोळेझाक केली जात असल्याने या प्रश्नी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे पोलिसांवर आरोप होत असताना देखील पोलिसांनी याबाबत निव्वळ सुरू असलेल्या दारू धंद्याकडे बघ्याची भूमिका घेऊन कारवाई न करणे म्हणजेच याचा अर्थ काय घ्यावा? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.





