पोलीस पाटील यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव: गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम.

सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

कणकवली/प्रतिनिधी

गाव कामगार पोलीस पाटील संघटना,कणकवली यांच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दहावी,बारावी,पदवीधर तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमात अनेक वर्षे पोलीस पाटील म्हणून प्रामाणिक व उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कसवन येथील पोलीस पाटील श्री.विजय भास्कर सावंत तसेच तोंडवली येथील पोलीस पाटील श्री.विजय मुकुंद मोर्ये यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
सन्मानित गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रतीक संजय बिळसकर(बारावी – विज्ञान),मिताली गोपाळ चव्हाण (पदवी),मितेश गोपाळ चव्हाण(दहावी), रितेश रविकांत नाईक (दहावी),शुभंकर दत्ताराम सावंत(इंजिनिअरिंग पदवी),दिव्या उदय सावंत (दहावी),उन्मेष अनंत राणे (दहावी),सौरभ अनंत राणे (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) तसेच वैष्णवी प्रदीप सावंत (दहावी) यांचा समावेश होता.
कार्यक्रमास कणकवली पोलीस स्टेशनच्या पीएसआय बर्गे मॅडम,पीएसआय नानचे साहेब,हेड कॉन्स्टेबल शिवगण साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच गाव कामगार पोलीस पाटील संघटना, कणकवलीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कणकवली तालुक्यातील सर्व पोलीस पाटील,गुणवंत विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच सेवानिवृत्त पोलीस पाटील यांनी बजावलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!