सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर

कणकवली तालुकाध्यक्ष पदाची धुरा पुन्हा प्रदीप मांजरेकर यांच्याकडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुका अध्यक्षपदी प्रदीप मांजरेकर यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच देवगड तालुका अध्यक्षपदी उमेश कुलकर्णी मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस सावंतवाडी अभय मालवणकर वेंगुर्ले वैभव वेंगुर्लेकर वैभववाडी भालचंद्र जाधव दोडामार्ग गुणाजी गवस यांच्या नियुक्ती प्रांताधिकारी हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या आहेत.





