हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ शुभारंभ

मालवण पंचायत समिती सदस्य दिपक (बंडू) चव्हाण यांच्या हस्ते बाळाला पल्स पाजण्यात आली

संतोष हिवाळेकर पोईप

आज सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी मालवण तालुक्यातील हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पल्स पोलिओ शुभारंभ करण्यात आला. मालवण पंचायत समिती सदस्य दिपक (बंडू) चव्हाण यांच्या हस्ते बाळाला पल्स पोलिओ डोस पाजण्यात आला. यावेळी हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती पुजा गवस, आरोग्य सहाय्यक आर. के. परब, स्टाफ नर्स श्रीमती एम. परब, आशा स्वयसेवीका श्रीमती रुपाली धुरी, औषध निर्माण अधिकारी गंधरेबा बर्वे, आरोग्य सेविका एस. एम. काणेकर, सफाई कामगार राजेश परब, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

error: Content is protected !!