अंगावर धावत येऊन मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट येथील सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

परस्पर विरोधी दहा जणांवर गुन्हे दाखल
फोंडाघाट बाजारपेठेतील सापळे पुलाजवळ दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी संजय आग्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत समीर सामंत हे फोंडाघाट गावाबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असतात. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास फोंडाघाट बाजारापेठेतील सापळे पूलाजवळ पूल बांधकामाची संजय आग्रे व त्यांची मित्रमंडळी पाहणी करत असताना समीर सामंत हे अरुण सामंत यांच्या कारमधून तिथे आले. तसेच संजय आग्रे यांना पाहून तुम्ही येथे काय करता? याही पुलाच्या बांधकामाचे पैसे खायचे आहेत काय? असे विचारले. तेव्हा आग्रे यांनी समीर याला तू आम्हाला विचारणारा कोण ? असा सवाल केल्याच्या रागातून समीर हा कारमधून उतरून आग्रे यांना शिवीगाळ करून एकेकाला बघून घेईन, ठार मारेन अशी धमकी दिली. तेव्हा आग्रे यांनी समीरला तू गावाची बदनामी फेसबुकवर करू नको असे सांगितले. त्यानंतर समीर याने रागाने आग्रे यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांच्या गळ्याला धरून ओढून धक्काबुक्की केली. तसेच हाताच्या ठोशाने मारहाण केली. तसेच आग्रे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन अप्रामाणिकपणे घेऊन गेला, अशी फिर्याद संजय आग्रे यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार समीर सामंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.





