वालावलमध्ये सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण शिबिर

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्याहस्ते शुभारंभ

कुडाळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल येथे मंगळवारी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचा शुभारंभ नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला.
या शिबिरात एकूण विविध १३ साथ रोगांवर आपल्या CPHC च्या माध्यमातून कशी लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देता येईल याबद्दल अनुभवी प्रशिक्षकांकडून आरोग्य सेवक, परिचारिका, CHO, आशा या सर्वांना गटानुसार प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवस अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कुडाळ तालुक्यातील वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हे प्रशिक्षण देण्यात आले अशाप्रकारचा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आल्याचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीम. सई धुरी मॅडम यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर म्हणाले, आरोग्य सेविकांप्रमाणे आशा सेविकांना त्यांच्या बरोबरीनेच मानधन मिळावे व आपण त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून आपल्याला न्याय देऊ असे, आश्वासन उपस्थितांना दिले.
यावेळी वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावस्कर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीम. सई धुरी, वालावल प्राथमिक केंद्र अधीक्षक डॉ. सचिन जंगम, जिल्हा प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल वाघ, जिल्हा प्रशिक्षण पर्यवेक्षक डॉ. संजीव नाईक, आरोग्यसेविका, CHO, आशा सेविका आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!