कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 12 जुलै रोजी

पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, ता. कणकवली यांच्या वतीने यावर्षी कणकवली तालुक्यातील गौड ब्राह्मण समाजातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा “गुणगौरव सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी तीन वाजता फोंडाघाट येथील पूर्णानंद भवन या ठिकाणी येथे संपन्न होणार आहे.
यामध्ये दहावी मध्ये 80 तर बारावी मध्ये 70 टक्के व अन्य विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता दहावी, बारावी व पदवीधर परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात येणार आहे. समाजातील पात्र विद्यार्थ्यांनी आपले नाव, परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिकेची प्रत, शाळा अथवा महाविद्यालयाचे नाव, पत्ता व संपर्क माहिती 25 जून २०२६ पर्यंत मंडळाकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच समाजातील सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मंडळाच्या कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्री. रामचंद्र बावकर 9421322715, मंदार अवसरे 9326603197, प्रथमेश महाजन 7499606293 व श्री. अरुण सामंत 9423300002 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश सामंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.





