चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण जाहीर…!

चिंदर ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवार १२ जून रोजी चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या ग्रामसभेत पिठासीन अधिकारी आत्माराम परब विस्तार अधिकारी पंचायत समिती मालवण यांनी ग्रामपंचायत प्रशासक सौ. स्वरा पालकर, ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर केले. चक्रानूक्रमे फिरणाऱ्या आरक्षणा मध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग आरक्षणासाठी प्रभाग एक आणि प्रभाग दोन मध्ये चिठ्ठी द्वारा सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग दोन मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग मध्ये जागा निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे प्रभाग निहाय आरक्षणास कोणीही आक्षेप न घेता सर्वांनूमते मंजूर करण्यात आले.

प्रभाग रचना अशी असणार

प्रभाग क्रमांक – १ – सडेवाडी, तेरई, भगवंतगड, लब्देवाडी

प्रभाग क्रमांक – २ – भटवाडी, देऊळवाडी, कुंभारवाडी

प्रभाग क्रमांक – ३ – चिंदर बाजार, अपराज कोंडवाडी, नागोचीवाडी, खरीवाडी, पडेकाप, बागवाडी

प्रभाग क्रमांक – ४ – गावठणवाडी, गावडेवाडी, पालकरवाडी, पाटणवाडी, साटमवाडी

कोणत्या प्रभागात कोणत आरक्षण

प्रभाग क्रमांक १ – सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रमांक ३ सर्वसाधारण, सर्व साधारण महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला

प्रभाग क्रमांक ४ सर्वसाधारण,
सर्वसाधारण महिला

सरपंच आरक्षण यापूर्वीच जाहीर झाल्याने यामध्ये एकूण सदस्य संख्या ११ असून ४ सर्वसाधारण, ५ सर्व साधारण महिला, १ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर १ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अशी आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, दिपक सुर्वे, केदार परुळेकर, धोंडी चिंदरकर, संतोष कोदे, संतोष गांवकर, हिमाली अमरे, सुहास चिंदरकर, पोलिस कॉन्स्टेबल विशाल वैजल, दिनेश पाताडे, मनोज हडकर, देवेंद्र हडकर, गोपाळ लब्दे, पंढरीनाथ हडकर, दत्ताराम वराडकर, मंगेश नाटेकर, सुनिल पवार, सचिन आचरेकर, आकाश कराळे, संजय भोगले, चिन्मयी पाताडे, अरूण गोसावी, शोधन मांजरेकर, संतोष अपराज, विनोद लब्दे, संजय नाईक, भक्ती पडवळ, रसिका पडवळ, हेमांगी मावजेकर, अजित साटम, सुबोध गांवकर, प्रिया पालकर, पूणम खोत, रविंद्र घागरे, आशिष रावराणे, प्रफुल्ल फाटक, महेश हडकर, संजय लोके, अमित पवार, भालचंद्र अपराज, आनंद पवार, मिथुन माळगांवकर, विजय माळगांवकर, उदय गोसावी, शंकर अपराज, काशिराम अपराज, प्रकाश परुळेकर, दिगंबर जाधव, रविंद्र लब्दे, सोनाली माळगांवकर, स्वरा चिंदरकर, समृध्दी अपराज, प्रतिक्षा पालकर-माडये, दत्ताराम लाड ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!