…तर सिंधुदुर्ग जिल्हा पहिला लवजिहादमुक्त जिल्हा होईल !

हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांचे प्रतिपादन
झाराप येथे ‘लव्ह जिहाद’ वर व्याख्यान
मुलींमध्ये जर धर्मप्रेम निर्माण झाले तर लवजिहादचे भय उरणार नाही. जर देशाला हिंदु राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर जिजाऊंची गरज आहे. आपल्या मुलींना शत्रूबोध करून दिला पाहिजे. एकटी हिंदु जनजागृती समिती काही करू शकत नाही. तर तुम्ही प्रत्येकाने सहभाग दिला तर ‘बेटी सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ अभियान जिल्ह्यातील प्रत्येक मुलीपर्यत पोहचवून आपण यशस्वी करू आणि यामाध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा पहिला लवजिहादमुक्त जिल्हा घोषीत करू, असे असे प्रतिपादन श्री.रमेश शिंदे यांनी झाराप येथील लवजिहाद विशेष व्याख्यानात बोलताना केले.
हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित झाराप येथील हॉटेल आराध्य मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाला हिंदू बंधूभगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शंखनाद करण्यात आला
यानंतर बोलताना रमेश शिंदे म्हणाले की, केरळमध्ये २००६ मध्ये लवजिहादची पहिली केस दाखल झाली. जगभरात जिहादचा भस्मासूर पसरला आहे. आपल्याला शत्रू कोण आणि मित्र कोण याचा बोध व्हायला हवा तर आपण टिकू शकतो. १९७१ साली झालेले बांगलादेशातील हिंदू महिलांवरील अत्याचार, १९९० मधील काश्मीरी हिंदू महिलांवर अत्याचार झाले. १९९२ मधील अजमेर सेक्स स्कँडल झाले. तरीही लवजिहाद नाही असे म्हणायचे का? हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘हर घर योद्धा’ अभियान चालवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून असे प्रशिक्षण दिले जाईल की हिंदू बांधव किमान स्वत:चे रक्षण करू शकतो. सोशल मिडीयाचा लवजिहादसाठी मोठा प्रभाव पडत आहे. रिलच्या मागे रिअल आयुष्यात होणार्या घटनांचा अभ्यास करायला हवा. सोशल मिडीयावरील आभासी जगात मुली फसतात आणि आयुष्याची वाट लागून घेतात. मुली आणि पालकांनी अत्यंत सावध रहायला हवे. मैत्रीच्या नावाखाली धर्मभ्रष्ट करण्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. धर्मासाठी राणी पद्मिनींने १६०० हिंदु स्त्रियांसह जौहार केला अशी उदाहरणे आपल्यालाकडे आहेत. तरीही हिंदु महिला, मुली धर्मभ्रष्ट का होतात? अधिकृत आकडेवारीनुसार वर्षभरात लाखो मुली देशभरातून गायब होतात. लवजिहाद थांबवायचा असेल तर हलाल प्रमाणित साहित्य घेणे थांबवायला हवे. कारण तो पैसा लवजिहादसाठी वापरला जातो.
छत्रपती शिवरायांनी जर सर्वधर्मसमभाव असता तर नेताजी पालकर, आणि बजाजी निंबाळकरांना पुन्हा स्वधर्मात घेतले असते का? छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस अनंत यातना सहन करूनही आपला धर्म सोडला नाही, हे लक्षात ठेवायला हवे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बेटी बचाव राष्ट्र बचाव अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे असे रमेश शिंदे यांनी सांगितले. सिंधुदुर्गातही या अभियानाची आपण सुरुवात करत आहोत. आपण सर्वांनी या अभियानात सहभाग घ्यावा आणि नवजात सारख्या प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी संघटित व्हावे असे आवाहन श्री शिंदे यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान ‘बेटी बचाव राष्ट्र बचाव’ अभियानाचे फलक अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या सौ.प्रीती राऊत म्हणाल्या की, आपल्या मुलींना सशक्त बनवायचे आहे. एकट्याने जिहाद्याचा सामना करण्याची शक्ती तिच्यात यायला हवी. प्रत्येकाने आपले घर सशक्त केले तरी समाज सशक्त होऊ शकतो. आता युद्धाचे स्वरूप बदलले आहे जिहाद आजही सुरू आहे. आताही ते लुटत आहेत. लवजिहादच्या शस्त्राच्या माध्यमातून हे सुरू आहे. अल्पवयीन मुलींचे ब्रेनवॉश अल्पवयीन मुलींच्या माध्यमातूनच केले जात आहे. आपण सहिष्णु आहोत हा आपला दोष झाला आहे. झाशीच्या राणीच्या घोषणा नुसती देऊ नका तसे वागा. आपल्या जीवितावर आणि अब्रुवर घाला घातला जात असेल तर स्वरक्षणासाठी दुसर्याला संपवणे हा आपला घटनात्मक अधिकार आहे. आजची मुलगी उद्याची माता आहे. ती पूर्ण परिवाराला मॅनिप्युलेट करू शकतात. त्यामुळे महिलांनाच हेरले जाते. स्वत:ला अबला समजणे बंद करा. स्वत: सशक्त व्हा आणि कुटुंबालाही सक्षम करा. शारिरीक आणि मानसिकदृष्टया सक्षम करायला हवे. भारतात दररोज १ हजार महिला लवजिहादला बळी पडतात. हिंदु धर्म महिलाच टिकवू शकतात. लवजिहाद विरोधात जनजागृतीसुद्धा सर्व स्तरावर व्हायला हवी. एकतेची शक्ती निर्माण करायला हवी. तर सरकार कोणाचेही असो गांभीर्याने जिहादची दखल घेईल. स्वत:च्या धर्माबद्दल अभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या घरात असे वातावरण निर्माण करायला हवे की स्वत:च्या रक्षणाची, लढण्याची वृत्ती निर्माण होईल. नरेटीव्ह हेसुदधा एक वॉरफेअर आहे. हिंदु सरकारने हिंदूंच्या उन्नतीसाठी कटीबद्ध रहायला हवे.
सदगुरू स्वाती खाडये म्हणाल्या की, अधर्मापासून आपले रक्षण होण्यासाठी आपण उपाययोजना काढत नाही. जर धर्माचे रक्षण करत नसू तर धर्म आपले रक्षण कसे करणार? फक्त पैसा प्राण वाचवू शकत नाही. धर्मच आपले रक्षण करू शकतो. त्यासाठी धर्मशिक्षण हवे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुली लवजिहादला बळी पडल्या आहेत. फक्त प्रकरणे बाहेर पडली नाहीत. कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असून धर्म बाजूला पडला आहे. लव जिहाद करणारे आणि त्याला समर्थन करणारे यांची एक लॉबी आहे. आपल्या मुलींवर लक्ष ठेवा. वेळ निघून गेल्यावर आक्रोश करण्यात काही उपयोग नाही. लवजिहादला बळी पडलेल्या प्रत्येक मुलीचे आयुष्य नरक झालेले आहे. केरला स्टोरीचे भाग प्रसिद्ध होऊनही भारतात हिंदू मुलींवर काही फरक पडलेला नाही. साम्यवादी इकोसिस्टीम हिंदू धर्मात स्त्री सुरक्षित नाही असा खोटा नॅरेटीव्ह पसरवत आहे. यासाठी धर्मशिक्षणाची गरज आहे. हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षण विनामूल्य देत आहे. महिलांनी श्रृंगार करावा. परंतु त्यात एक तरी श्रृंगार शौर्याचा असू दे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहेमंत मणेरीकर यांनी केले. सुमारे १ हजाराहून अधिक हिंदू बंधुभगिनींची या कार्यक्रमाला उस्फुर्तपणे उपस्थित होते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या मार्गदर्शनाला उपस्थिती दर्शवली.





