वतन गोवळकर यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक यांचेकडून बी.ए. एम.एस (BAMS)पदवी प्रदान

रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल येथे पूर्ण केले वैद्यकीय शिक्षण
वायंगणी गावात स्थितअसलेल्या वतन गोवळकर (मूळ गाव-कोर्ले,देवगड)यांनी आपले माध्यमिक शिक्षण हे माध्यमिक विद्यालय जुवाटी ,राजापुर येथे पूर्ण केल्यावर, आपले 12विज्ञान पर्यत चे शिक्षण खारेपाटण कॉलेज येथे पूर्ण केले.12वी मध्ये विज्ञान शाखेतून बोर्ड परीक्षेत खारेपाटण कॉलेज मध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.त्यानंतर वैद्यकीय क्षेत्राचा ध्यास असल्याने त्यानी पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल येथे 2015 साली प्रवेश घेतला त्यानंतर तेथे त्यांनी BAMS चे शिक्षण पूर्ण केले .5.1 वर्षाचा वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करत वतन गोवळकर चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाले.त्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक या विद्यापीठाकडून नुकतीच BAMS पदवी प्राप्त झाली आहे .या त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.आपल्या या यशात आई-वडील ,(वडील वासुदेव गोवळकर हे माध्यमिक विद्यालय जुवाटी येथे मुख्याध्यापक पदी कार्यरत आहेत)भाऊ आणि नातेवाईक यांची मोलाची साथ मिळाली असे वतन गोवळकर यांनी आपले मत व्यक्त केले.वतन गोवळकर सध्या वसई विरार शहर महानगर येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.असून त्याच्या पुढील वाटचाली साठी त्यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण