अन्नपूर्णा महिला उद्योजक गटाचा शुभारंभ

उमेद अभियान व ग्रामपंचायत रामगड यांच्या प्रयत्नाने रामगड येथे अन्नपूर्णा महिला उद्योजक गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या रामगड बाजारपेठ येथील कार्यालयाचे उद्घाटन सरपंच शुभम मटकर यांच्या हस्ते करण्यात आले .
ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी व महिलांनी उद्योजक बनवण्यासाठी या गटाची निर्माती करण्यात आली आहे. या गटाच्या माध्यमातून तळलेले फणसाचे गरे , कुळीद पीठ मोदक पीठ या सारखी विविध प्रकारची पीठ , मसाले , कोकम सरबत , आगळ इत्यादी दर्जेदार उत्पादने बाजारात उपलब्ध होणार आहेत.
या गटामध्ये २६ महिला सहभागी असून व्यवसाय यशस्वी रित्या पूर्ण करत अजून महिलांना या उद्योगाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश लवकरच पूर्ण होईल असा विश्वास सहभागी महिलांनी व्यक्त केला आहे.
या उद्योजक गटासाठी रामगड सरपंच शुभम मटकर, गणेश काजू उद्योगाचे श्री सुरेश नेरुरकर व उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री कांबळी यांचे विशेष सहकार्य लाभले.





