फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना विशेष शिबिराचे आयोजन

फोंडाघाट ग्रामपंचायत व तहसीलदार कार्यालयाचे आयोजन
डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन
फोंडाघाट कणकवली येथे संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात डिजिटल हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदरचे शिबिर हे तहसील कार्यालय कणकवली व ग्रामपंचायत फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी फोंडाघाट सरपंच संजना आग्रे, फोंडाघाट मंडळ अधिकारी प्रवीण मोंढे, संजय गांधी शाखेचे सहायक महसूल अधिकारी धनंजय सिंगनाथ, ग्राम महसूल अधिकारी गवस, ग्रामसेवक मंगेश राणे तसेच ग्रामपंचायतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. या कॅम्पमध्ये एकूण 43 लाभार्थ्यांचे हयात दाखले करण्यात आले. लाभार्थी यांची पेन्शन सुरू राहण्यासाठी डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तहसील कार्यालय कणकवली मार्फत तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी डिजिटल हयात प्रमाणपत्र काढून घ्यावे.
या आठवड्यात सर्व ग्रामपंचायत मध्ये शिबिर आयोजित करण्यात येत आहे. तसेच तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत देखील सदरची दाखला काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरच्या सुविधेचा लाभ घ्यावा व डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.






