विद्यार्थ्यांसाठी बाळकृष्ण पेडणेकर यांचे विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबिर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विशेष बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकॅडमीच्या प्रशिक्षण केंद्रात होणार आहे.
आगामी काळात होणाऱ्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या शिबिरात विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. बुद्धिबळातील ओपनिंग, मिडलगेम, एण्डगेम, टॅक्टिकल गेम तसेच स्पर्धेचे नियम आदी महत्त्वाच्या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे कौस्तुभ पेडणेकर यांच्याकडे मो. ८००७३८२७८३ या क्रमांकावर नोंदवावीत.

error: Content is protected !!