कणकवली शहरात केलेल्या कामांची माहिती विरोधी गटनेत्या सुप्रिया नलावडे यांनी मागवली

विविध विकासकामांच्या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

कणकवली नगरपंचायत ह‌द्दीतील काही विकास कामे मागील एक महिन्यात करण्यात आली असून, या सर्व कामांच्या कागदपत्रांच्या प्रती भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या गटनेत्या सुप्रिया नलावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागितल्या आहेत. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे आप्पासाहेब पटवर्धन चौक ते ढालकाठी रस्ता, जळकेवाडी प्रभूगावकर घर ते रासम घर रस्ता व जळकेवाडी म्हसकर हॉस्पिटल ते चिंदरकर घर रस्ता या रस्तांचे डांबरीकरणाचे काम व जुना नरडवे रस्ता कनक पॅराडाईजकडे जाणाऱ्या रस्त्याला कॉक्रीट गटारसह स्लॅब टाकणे, नगरपंचायत रस्ता माणगावकर घरासमोर कॉक्रीट गटारसह स्लॅब टाकणे हि कामे मागील एका महिन्याच्या कालावधीमध्ये करण्यात आलेले दिसून येत आहे, तरी सदर कामांची अंदाजपत्रके, निविदा प्रक्रिया संबंधी सर्व माहिती, प्रशासकीय मान्यता आदेश व कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशी मागणी सुप्रिया नलावडे यांनी केली. आहे.

error: Content is protected !!