पावशी येथे मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात

मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका संपत नाहीये. महामार्गावर पावशी येथील श्री मार्कंडेय मंदीर समोर गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटलेला टेम्पोने महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी रोलिंगला धडक देत, रोलिंग तोडले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले. तसेच महामार्गाच्या रोलिंगचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहाटे पडलेल्या अवकाळी पावसामुळे वाहन घसरून अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!