कणकवली बाजारपेठेत महाडिक टेलर्स दुकानाला आग लागून नुकसान

स्थानिकांच्या साहाय्याने आग आटोक्यात
बाजारपेठेत रविवारी रात्री बाराच्या दरम्यान प्रसाद महाडिक यांच्या महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती समजतात अनेक युवकांनी व नागरिकांनी आग वीजवण्यासाठी धाव घेतली. या आगीत दुकानाचे व घरातील काही साहित्याचे जळून नुकसान झाले. शॉर्टसर्किटने आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रण ठेवण्यात यश आले. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील घटनास्थळी पोहोचत मदत कार्य केले.
नगरपंचायतीचा अग्निशामक बंब तत्परतेने घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेमुळे बाजारपेठेत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, महाडिक लेडीज टेलर्स या दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रेस, साड्या, दप्तर, छत्री रेनकोट शिलाई मशीन विक्रीसाठी हे आणण्यात आले होते. हे सर्व साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे तसेच फर्निचर वायरिंग इंटेरियर या सर्व वस्तूंचे देखील मोठे नुकसान झाले आहे.





