वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त मसदे येथे आज रक्तदान शिबिर

मसदे येथे आज रक्तदान शिबिर
मसदे येथील बागायत आवळदेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेनिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 12 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मसदे आवळदेवाडी बस स्टॉप परिसरात, मसदे पेट्रोल पंपाजवळ आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
याशिवाय कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.





