आचरा तिठा येथे वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी

उन्हाळी सुट्टी मुळे वाहनांमध्ये वाढ झाली आहे. यातच रस्त्याकडेला वेडीवाकडी वाहने उभी करून ठेवत असल्याने आचरा तिठा येथे कायम वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे याबाबत आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी आचरा पोलीस स्टेशनला भेट देत आचरा तिठा येथे वाहतूक पोलीस ,किंवा पोलीस नेमण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्या सोबतशिवसेना उप जिल्हाप्रमुख महेश राणे, उपसरपंच संतोष मिराशी,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, जयप्रकाश परुळेकर,बाबू कदम,आदीं उपस्थित होते.





