विज समस्यां बाबत आचरा सरपंच आक्रमक

विजकार्यालयावर धडक देत विचारला जाब

गेले काही दिवस सुरु असलेल्या विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला होता. यातच शनिवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे आचरा भागातील वीज समस्येने उग्र रूप धारण केले होते.ऐन आठवडा बाजारादिवशीच रविवारी बाजारपेठेतली लाईट नसल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले.यामुळे आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, यांनी सोमवारी सकाळी आचरा बाजारपेठ विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक देत वीज मंडळ अधिका-यांना वीज समस्या तातडीने निवारणा करण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांच्या सोबत
शिवसेना उप जिल्हाप्रमुख महेश राणे, उपसरपंच संतोष मिराशी,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, खजिनदार जयप्रकाश परुळेकर,बाबू कदम,चंदू कदम,सुरेंद्र कुबल आदीं उपस्थित होते.
विद्यूतलाईन वर आलेली झाडे तोडणी करण्यासाठी तातडीने उपाय योजना करा मदतीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु मात्र वीज समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. यावेळी उपस्थित विजमंडळाचे अधिकारी वर्मा, गावकर, शिंदे यांनी आम्ही वीज समस्या निवारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र काही वेळा दोष हा एकदम सुक्ष्म असल्याने तो मिळण्यास वेळ लागतो. यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब लागतो. याबाबत ग्राहकांना होणा-या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त केली.

error: Content is protected !!