उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे विशेष स्वच्छता अभियान संपन्न

RTO सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली स्वच्छता शपथ

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आज विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत कार्यालय परिसर, अभिलेख विभाग, प्रतीक्षागृह तसेच इतर कार्यालयीन भागांची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यालय स्वच्छ व निटनेटके ठेवण्याचा संदेश दिला.

यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली. “स्वच्छता ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक जबाबदारी असून, कार्यालय व परिसर नेहमी स्वच्छ, सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा,” असा निर्धार करण्यात आला.

तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनीही स्वच्छता राखून प्रशासनास सहकार्य करावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छ वातावरण निर्मितीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्याकडून करण्यात आले.

या उपक्रमामुळे स्वच्छता ही सवय आणि सामूहिक जबाबदारी म्हणून रुजविण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला असून, नागरिकाभिमुख व स्वच्छ कार्यालयीन संस्कृती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः अभियानात सहभागी होत कार्यालय परिसराची साफसफाई केली व स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश दिला.

सदर अभियान हे निरंतर चालणारे असून, कार्यालय व कार्यालय परिसर कायमस्वरूपी स्वच्छ, निटनेटके व टापटीप ठेवण्याची प्रतिज्ञा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी केली.

error: Content is protected !!