मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पं.स.दौंड,पुणे समितीने दिली खारेपाटण ग्रामपंचायतीला दिली सदिच्छा भेट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत गट विकास अधिकारी पंचायत समिती स्तरावरील महाराष्ट्र शासनाच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या पुणे दौंड येथील पंचायत मूल्यमापन समितीने नुकतीच कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीला भेट सदिच्छा भेट दिली.व ग्रामपंचायत राबवीत असलेल्या उपक्रमांना भेटी देऊन त्याची पाहणी केली.
पुणे दौंड येथून आलेल्या या तालुकास्तरीय मूल्यमापन समिती मध्ये पं.स.दौंड गट विकास अधिकारी तथा समिती अध्यक्ष श्री अरुण मरभळ यांसह एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी दौंड चे संदीप काळे, मलठण ता.दौंड चे ग्रामविकास अधिकारी श्री दीपक बोरावके,दौंड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री रमेश वत्रे,पं.स. दौंड विस्तार अधिकारी श्री प्रशांत बगाडे,पं.स.दौंड डाटा एन्ट्री ऑपरेटर श्री स्नेहल जगताप यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील कणकवली पंचायत समितीमध्ये समाविष्ट असलेल्याl प्रमुख केंद्रित ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करण्यासाठी दि.२६ एप्रिल २०२६ ते दि.१५ मे २०२६ या कालावधीत पुणे दौंड येथील समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली असून आज बुधवारी ६ मे २०२६ रोजी सकाळी या समितीने खारेपाटण ग्रामपंचायतीला भेट दिली.या समितीचे खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री महेंद्र गुरव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ प्राची ईसवलकर,पंचायत समिती सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण ग्रामचायत सदस्य सौ मनाली होणाळे,क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार,अमिषा गुरव, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर,खारेपाटण ग्रा.पं. ग्रामविकास अधिकारी श्री विशाल वरवडेकर आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या समितीने खारेपाटण येथील श्री देव कपिलेश्वर मंदिराला भेट देऊन येथील प्राचीन श्री देव सूर्यनारायण मूर्तीची पाहणी केली.तर खारेपाटण येथील ग्रामदैवत असलेल्या ७२ खेड्याच्या श्री देव कालभैरव मंदिराला भेट दिली.तसेच महाराष्ट्रातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेल्या खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ ला भेट दिली.व संपूर्ण शाळेची पाहणी केली.यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांनी समितीचे स्वागत करून शाळेच्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.तसेच या समितीने खारेपाटण येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या प्राचीन खारेपाटण किल्ल्याला भेट दिली.व संपूर्ण किल्ला परिसराची पाहणी केली. याबरोबरच खारेपाटण येथील महिला बचत गटाच्या कोकम बटर उत्पादन प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी श्री स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सौ जागृती पोटले आस्था पाटणकर,सायली तुरळकर, श्रीम. युती पोमेडकर आदी महिला उपस्थित होत्या.तसेच गांडुळ खत प्रोजेक्ट व शुक नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची देखील पाहणी केली.
पुणे दौंड येथून आलेल्या या मूल्यमापन समितीने खारेपाटण ग्रामपंचायतीचे अभिलेख दप्तर अद्यावत असलेबाबत समाधान व्यक्त केले.तसेच खारेपाटण ग्रामपंचायत राबवीत असलेल्या वेगवेळ्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.आणि विशेषता महिला बचत गटाच्या व्यवसायांचे व कामाचे कौतुक केले.





