रेवंडी येथे श्री सत्यनारायण महापूजेला आमदार निलेश राणे यांची उपस्थिती

ग्रामस्थांशी संवाद साधत आमदार निलेश राणे यांनी घेतले श्री सत्यनारायणाचे दर्शन
मालवण तालुक्यातील रेवंडी गावामध्ये कांबळेवाडी उत्कर्ष मंडळ, मुंबई यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेला कुडाळ-मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महापूजेच्या निमित्ताने गावामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार निलेश राणे यांनी कार्यक्रमात सहभागी होत ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी गावाच्या विकासकामांबाबत चर्चा करत स्थानिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच सामाजिक एकोपा आणि परंपरा जपणाऱ्या अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे उत्साहात स्वागत केले. गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
या प्रसंगी शिवसेना नेत्या श्रीमती मीनाताई कांबळी, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी सामंत, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रेवंडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांबळेवाडी उत्कर्ष मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.





