मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

मुंबईतील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासंदर्भात काल मंत्रालयात बैठक पार पडली.
या बैठकीत इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर, आयआयटी बॉम्बे यांनी वॉटर मेट्रो स्टेशनच्या संकल्पना आणि सजावटीचे सादरीकरण केले. तसेच कळ्हेर, वाशी, गेटवे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील प्रस्तावित स्टेशनच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी धक्का (Dock) कशा पद्धतीने उभारला जाणार, प्रवाशांची व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन तसेच बोटींच्या हालचाली आणि टर्नअराउंड व्यवस्थेबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीला आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.





