भाजपा कडून माजी आमदार प्रमोद जठार यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

सिंधुदुर्गातील भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
माजी आमदार व भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले प्रमोद जठार यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यांचे नाव जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





