खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडवे येथे भव्य मोफत महा-आरोग्य शिबीर

लाभ घेण्याचे करण्यात आले आहे आवाहन

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एसएसपीएम’ (SSPM) मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे यांच्या वतीने भव्य मोफत महा-आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “वाढदिवस लोकनेत्याचा, संकल्प जन-आरोग्याचा” हे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेले हे शिबीर ९ आणि १० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.
या महा-आरोग्य शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ‘सर्व विभागांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली मोफत तपासणी’ केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्करोग, बालरोग, त्वचारोग, नेत्ररोग, किडनी विकार, अस्थिरोग, जनरल सर्जरी, दंतरोग, कान-नाक-घसा, जनरल मेडिसिन, फिजिओथेरपी आणि आहारतज्ज्ञ सल्ला यांसारख्या विविध आरोग्य सेवांचा लाभ रुग्णांना घेता येईल.
तपासणीसोबतच रुग्णांना मोफत सोनोग्राफी, एक्स-रे, लॅब तपासणी, औषधे, २D इको आणि ई.सी.जी. यांसारख्या महागड्या चाचण्यांची सुविधाही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे शिबीर एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे संपन्न होणार आहे.
शिबिराच्या अधिक माहितीसाठी अनिल कुडपकर (९४२०९०७६६१) किंवा हॉस्पिटलच्या ८२०८३२८११८ व ९३७००५६०७६ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!