दाभोली येथे विवेक जोशी यांच्या स्वयंपाकघरात आला बिबट्या

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

स्वयंपाक घरात बिबट्याने घेतली वामकुक्षी

वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली कोऱ्याचीवाडी येथे विवेक जोशी यांच्या घराच्या स्वयंपाक घरात चक्क बिबट्या येऊन बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जोशी यांच्या हा प्रकार लक्षात येतात त्यांनी घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वन विभागाला दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान बिबट्याने स्वयंपाक घरात वामकुक्षी घेतल्याचेही एका फोटोतून दिसून येत आहे.

error: Content is protected !!