श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त वायंगणी येथे विविध कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त बुधवार 15 एप्रिल रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी तर्फे करण्यात आले आहे‌. यानिमित्त सकाळी पाच वाजता दुग्ध अभिषेक सकाळी साडेसात वाजता नित्य आरती, सकाळी नऊ वाजता अभिषेक, सकाळी 11 ते सायंकाळी सहा स्थानिकांची भजने दुपारी महाप्रसाद , दुपारी एक वाजता हभप परब महाराज वायंगवडे मालवण यांचे सद्गुरु महात्म्य नारदिया कीर्तन होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक सुर्वे कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर यांसह श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!