सुशांत दळवी खून प्रकरणात संशयित आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

खुनातील आरोपी बरोबर अजून कोण सहकारी याचा व अन्य बाबींचा तपास करण्यासाठी रिमांड मध्ये मागणी
बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अमर कदम (१९, रा. ओरोस) याला आज शनिवारी दुपारनंतर ओरोस येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. स्वाती पाटील (अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वर्ग ३) यांनी त्याला ७दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. सौ. एस. वाय. गोबाडे यांनी काम पाहिले. खुनातील संशयीत आरोपी याच्यासोबत अन्य कोण सहकारी होते त्या अनुषंगाने अन्य तपास काम करता आरोपीला पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.





