आदर्श व्यापारी संघटना तळेरेची महिला व्यापारी संघटना स्थापन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामिण भागातील महिला व्यापारी संघटना
पहिली महिला व्यापारी संघटनेची अध्यक्षा संपदा महाडिक यांची एकमताने निवड
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सलग्न अशी आदर्श महिला व्यापारी संघटनेची स्थापना करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामिण भागातील पहिली महिला व्यापारी संघटना स्थापन करून जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
आदर्श व्यापारी संघटना तळेरेची संलग्न महिला व्यापारी संघटना, तळेरेची स्थापना आणि त्या निमित्त मेळाव्याला उपस्थित महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, अशोक गाड, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, सौ. माने, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर, उपसरपंच संदिप घाडी, सौ.अलका नारकर, अध्यक्ष राजू जठार, कार्याध्यक्ष अमोल सोरप, सहसेक्रेटरी आदित्य महाडिक, सहखजिनदार अशोक तळेकर, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पिसे, प्रविण वरुणकर, बाळा कदम, सचिन पावसकर, नामदेव वाडेकर, नुतन महिला अध्यक्षा सौ.संपदा महाडिक, सौ.नम्रता तळेकर इत्यादी व्यापारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार यांनी महिला व्यापारी संघटना स्थापन करण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. त्याचबरोबर वेळी संघटनेची ध्येय - धोरणे यावर चर्चा करण्यात आली. महिलांना व्यवसायातून स्वयंपूर्ण बनविणे, संघटन वाढविणे त्याचबरोबर व्यवसाय करत असताना आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक उपक्रम, पर्यटन, क्रीडा विषयक, रोजगार मेळावे, उत्पादन व्यवसाय या क्षेत्रात काम करण्याचे ठरले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, सौ. माने यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच दिलीप तळेकर, अरविंद नेवाळकर, दिपक बेलवलकर, सौ.अल्का नारकर यांनी महिला व्यापारी संघटनेची स्थापना केल्याबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि यासाठी वेळोवेळी लागणारे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
सुरुवातीला प्रथम महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा म्हणून सौ.संपदा महाडिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच पुढील बैठकीत संपूर्ण कार्यकारणीची निवड करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. यावेळी नुतन अध्यक्षा सौ. संपदा महाडिक यांचा जिल्हा महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हा महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी नुतन महिला अध्यक्षाचे अभिनंदन करून आदर्श व्यापारी संघटनेच्या कार्याप्रमाणेच महिला संघटना देखील आपल्या कार्याचा नावलौकिक मिळवून जिल्ह्यात एक नवीन आदर्श घालून देतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच महिलांनी देखील व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावावी त्यासाठी जिल्हा महासंघाकडून आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी दिली.





