“कोकण नाऊ कणकवली महोत्सवाचे”27 फेब्रुवारी ते 8 मार्च पर्यंत दिमाखदार आयोजन:कणकवलीकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी!

उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान फन फेअर,फूड फेस्टिवल,ऑटो एक्स्पो,कंझ्युमर स्टॉल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबजणार.
कणकवली/मयूर ठाकूर कणकवली शहरात आनंदाची उधळण करण्यासाठी ‘कोकण नाऊ कणकवली महोत्सव,फुड फेस्टिव्हल अँड फन फेअर’ सज्ज झाला आहे.येत्या २७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर हा भव्य सोहळा रंगणार असून,यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे.या महोत्सवात केवळ मनोरंजनच नाही,तर खरेदीची मोठी संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.यामध्ये ऑटोमोबाईल,प्रॉपर्टी आणि फर्निचर,इंटेरियर आणि सोलर सिस्टिम्स,लाईफ स्टाईल,कन्झ्युमर आणि हँडलूम हँडीक्राफ्ट यांचे स्टॉल असणार आहेत.तसेच
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दररोज सायंकाळी 05 ते रात्रौ 11 या वेळेत असणार असून
महोत्सवाचे मुख्य आकर्षण वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम हे आहेत.यामध्ये
२७ फेब्रु: ऐतिहासिक प्रसंग सादरीकरण
२८ फेब्रु: एकेरी नृत्य स्पर्धा
०१ मार्च: उडान आणि लोकजागर
०२ मार्च:डबलबारी
०३ मार्च: खेळ पैठणीचा
०४ मार्च: डॉग अँड कॅट शो (प्राणीप्रेमींसाठी खास आकर्षन)
०५ मार्च: कराओके स्पर्धा
०६ मार्च: दशावतारी नाटक
०७ मार्च: सिंधुदुर्ग सुंदरी (फॅशन शो)
०८ मार्च: जलवा (डान्स शो) अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.
उपस्थित सर्व प्रेक्षकांसाठी दररोज ‘लकी ड्रॉ‘ काढला जाणार असून,नशीबवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.सोबतच सर्वांसाठी “फन फेअर” आणि खवय्यांसाठी चविष्ट पदार्थांची रेलचेल असलेला “फूड फेस्टिव्हल” हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण असेल.या महोत्सवाची वेळ दररोज सायंकाळी ४.०० ते रात्रौ 11.०० पर्यंत असून उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान,कणकवली हे यां महोत्सवाच स्थळ आहे.स्टॉल बुकिंगसाठी संपर्क:९७६९६६८३८ असून आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी 9370440893,8408929923 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून
कणकवली आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा,असे आवाहन कोकण नाऊ चॅनेल तर्फे करण्यात आले आहे.




